शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला,घरगुती वादात भाजप आमदाराची उडी ( Video)

0
38
shivsena crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका महिलेच्या तोंडावर थुंकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती शिवसेनेचा पदाधिकारी असून तो आपल्या सूनेच्या तोंडावर थुंकताना दिसत आहे. याप्रकरणी सुनेने आपल्या सासऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका प्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक एकनाथ पाटील हे संकटात सापडले आहेत. पण हे सगळे खोटे असल्याचे एकनाथ पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हा व्हिडिओ खूप जुना असून हे भाजप पदाधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध रचलेलं कटकारस्थान असल्याचे शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांनी सांगितले आहे. तसेच भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांत काहीच तथ्य नसल्याचे एकनाथ पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील पीडित सुनेने भाजप आमदराकडे मदत मागितल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. आता ह्या सून आणि सासऱ्याच्या घरगुती वादात भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी उडी घेतली असून आरोपी सासऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील हे कल्याण ग्रामीण भागातील भोपर या गावामध्ये राहतात. या व्हिडिओमधील महिला हर्षदा पाटील या त्यांच्या सुनबाई आहेत. एकनाथ पाटील हे आपल्याला नेहमी मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचे हर्षदा पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात स्थानिक वरीष्ठ शिवसेना पदाधिकाऱ्यांना सासऱ्याची तक्रार केली असता, संबंधित पदाधिकारी एकनाथ पाटील यांच्या विरोधात जायला तयार नसल्याचेदेखील हर्षदा पाटील यांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करून घेतला नाही. यामुळे आपण मदतीसाठी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे गेली असल्याचे हर्षदा यांच्याकडून सांगण्यात आले आहे. माझा माझ्या सूनेशी काहीही वाद नाही. संबंधित व्हिडीओ जुना असून माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे असा आरोप एकनाथ पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here