… तर शिवसेना-भाजप एकत्र येईल; शिवसेनेच्या नेत्याचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारचा कारभार चांगला चालला असल्याचे आघाडीतील राज्यातील नेतेमंडळी सांगत आहेत. अशात आता शिवसेनेच्या एका मंत्र्यानेच शिवसेना व भाजप एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. “भविष्यात युतीचा प्रस्ताव ठेवल्यास आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास निश्चितच भाजप सोबतच्या युतीचा विचार विनिमय होऊ शकतो, असे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रात भविष्यात कुठलंही परिवर्तन करायची असल्यास त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी हे आहेत. गडकरी राज्यात आल्यावर ज्यादिवशी मने जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मने जुळतील. आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यादिवशी निर्णय घेतील आणि नितीन गडकरी व अमित शहा यांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते.

दरम्यान, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता चर्चेला उधाण मिळाले आहे. याबाबत आता शिवसेना व भाजपमधील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाणार हे पाहावे लागणार आहे.