हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. या दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नवनियुक्त्यांमधून कदम समर्थकांना डावलण्यात आले. यानंतर कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेतील अनिल परब हे गद्दार आहेत. त्यांच्याकडून माझ्याविरोधात खोटी माहिती मुख्यमंत्र्याना दिली गेली आहे, असा आरोप कदम यांनी यावेळी केला.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परषद घेत माध्यमांशी आज संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, माझी बाजू महाराष्ट्राच्या शिवसैनिकांसमोर यावी, मला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ते किती चुकीचं आहे. मला राजकीय दृष्ट्या उद्धवस्त करणारं हे सांगण्यासाठी माझी बाजू मांडत आहे. जी तथाकित ऑडिओ क्लिप आली त्यात मी शिवसेना, शिवसेना प्रमुख यांच्याबद्दल काही बोललेलो नाही. मी पक्षाला हानी होईल असं काहीही बोललो नाही. शिवसेना पक्ष प्रमुखांना जे पत्र देत दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून काही मत मांडली होती. अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यात येतात. संपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडल आहे.
अनिल परब पक्षाशी गद्दारी करुन आमच्या मुळावर उठला आहे. संजय कदम हा शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेला होता. संजय कदम याने भगवा झेंडा जाळून पाया खाली तुडवला होता. आम्ही संजय कदमला पराभूत केले. सूर्यकांत दळवी आणि संजय कदम यांनी शिवसेना भाजप विरोधात काम केले. अशा बाडग्यांना परब यांनी पदे दिली. उद्धव ठाकरेंना त्याची माहिती नसेल. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगतो कि सुनील तटकरेंच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न चालले आहेत. अनिल परब हेच पक्षातील गद्दार आहेत, असे कदम यांनी यावेळी म्हंटले.