हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवर आणिक कर्णनै विरोधकांकडून टीका केली जाते. या दरम्यान आता मोदींवर एका नव्या कारणांनी टीका केली जाऊ लागली आहे. ती म्हणजे त्यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या मर्सिडीज बेन्झ गाडीवरून होय. याच कारणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
“महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी खरेदी केली. गाडी खरेदी केल्याने त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.
खासदार राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर निशाणा साधत म्हंटले आहे की, मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी जगासमोर गंगास्नान केला. तरी देशातील लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही तर तो अजूनही कायम आहे.
स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र, त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी करू नये. पंडित नेहरू यांनी हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. जिवाला धोका असताना देखील इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे, असेही राऊत यांनी यावेळी म्हंटले आहे.