Shiv Sena MLA Disqualification Case । तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी ४ च्या आसपास शिवसेना आमदार अपात्रसह तब्बल ३४ याचिकांचा निकाल जाहीर करणार आहेत. शिवसेना नेमकी कोणाची? शिंदेंचे आमदार अपात्र होणार कि ठाकरेंचे हे आज स्पष्ट होणार असलयाने महाराष्ट्रसह संपूर्ण देशाचे लक्ष्य या निकालाकडे असणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं होत. यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयात यावर तब्बल दीड वर्ष सुनावणी पार पडली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निकाल (Shiv Sena MLA Disqualification Case) जाहीर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले. यावेळी कोर्टाने अनेक गोष्टींवर टिप्पणी करत शिंदे गटावर ताशेरे सुद्धा ओढल्याचे आपण बघितलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप?? Shiv Sena MLA Disqualification Case
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागील ३ महिन्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाची सुनावणी घेतली, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला, शिवसेनेची घटना दोन्ही गटाकडून मागून घेतली. त्यानंतर आज दुपारी चार वाजता ते आमदार अपात्रतेबाबत अंतिम (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल देणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष्य या निकालाकडे आहे. जर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र झाले ते महाराष्टच्या राजकारणात आणखी एक भूकंप होऊ शकतो. आणि जर ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर आहे तसेच सरकार पुढे काम करत राहील. त्यामुळे निकाल नेमका काय लागेल? ठाकरेंना दिलासा मिळणार का? कि शिंदे पुन्हा एकदा ठाकरेंवर भारी पडणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
शिंदे गटाच्या कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, बालाजी किणीकर, यामिनी जाधव, संजय शिरसाठ, लता सोनवणे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, रमेश बोरनारे, भरत गोगावले, अनिल बाबर
ठाकरे गटाच्या कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
सुनिल प्रभू, वैभव नाईक, भास्कर जाधव, राहुल पाटील, रवींद्र वायकर, अजय चौधरी, नितीन देशमुख, कैलास पाटील, रमेश कोरगावंकर, उदयसिंह राजपूत, संजय पोतनीस, प्रकाश फातर्फेकर, राजन साळवी, सुनिल राऊत