हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भेट घेतली. तसेच देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए आहेच कुठे ? असा सवाल ममता बॅनर्जींनी विचारला होता. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. पश्चिम बंगाल व महाराष्ट्राने देशातील राजकारणाला एक दिशा दिलेली आहे. यूपीएचे काय करायचे? यूपीए कुठे आहे असा प्रश्न ममतांनी केला आहे. देशातील राजकारणात एपीएचे महत्व असणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी हे यूपीएचे प्रतीक आहे, असे राऊत यांनी म्हंटले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत. तरीही आम्ही चांगल्या प्रकारे काम करीत आहोत. महाराष्ट्रातील काँग्रेसबाबात सांगायचे झाले तर काँग्रेस सोबत राहून काम केल्यास चांगले होईल. काँग्रेसला बाजूला ठेऊन आघाडी करणे योग्य होणार नाही. विशेष म्हणजे कितीही आघाड्या झाल्या तरी याचा फायदा हा भाजपलाच होतोय. महाविकास आघाडी हे यूपीएचे प्रतीक आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
वीर सावरकरांच्याबाबत सांगायचे झाले तर त्यांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. आणि सावरकरांचे विचार हे हिंदुत्ववादी आहेत. त्यांचे विचार बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे नेले आहे. आम्ही भित्रे नाही आहोत. हिदुत्वाच्याबाबत आम्ही कधीच घुमजावची भूमिका घेतलेली नाही, असे राऊत यांनी म्हंटले.