हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून रविवारी आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली. या हत्यांनंतर आता येथील परिस्थिती आणखीन बिघडली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या व ईडी, सीबीआय, एनसीबीकडून राज्य सरकारवर अनेक कारणांमध्ये चौकशी करून हल्ले केले जात आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “ईडी, सीबीआय, एनसीबी व किरीट सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू काश्मिर फिरत बसतील,” असे राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांविषयी बोलण्यापेक्षा काश्मिरमध्ये त्या दहशतवाद्यांच्या संदर्भात बोलायला पाहिजे. मात्र, ते बोलत नाहीत. महाविकास आघाडीतील नेत्यांनाही नुसते खुर्च्यावर बसून चालणार नाही. कधी काश्मिरी पंडितांना मारले जात आहे. ही जबाबदारी केंद्र सरकार गृहमंत्रालयाची आहे.
यावेळी राऊतांनी महाराष्ट्रातईडी, सीबीआयकडून टाकल्या जात असलेल्या धाडीवरून व त्याच्याशी निगडित असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे. या दोघांनी जम्मू काश्मीर येथे जावे, असे राऊत यांनी संगितले आहे.