हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. संसदेत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासंदर्भात मागणी केलीजात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राऊतांनी महत्वाची माहिती दिली आहे. “मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असून मराठा आरक्षण मुद्यावर संसदेच्या अधिवेशनात विषय मांडणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी पक्ष संघटना वाढी संदर्भात चर्चा केली असून दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत मराठा अधिवेशनावर चर्चा करणार आहे.
मराठा आरक्षणाबाबत माहिती देताना राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. या आरक्षणाबाबत घटनात्मक दृष्ट्या कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत. वास्तविक पाहता मराठा आरक्षणाबाबत घटनादुरुस्ती करताना जो पर्यंत 50 टक्क्यांची मर्यादा वाढवली जात नाही तोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार काही करु शकणार नाही,असे राऊत यांनी म्हटले.