मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेच्या सत्तेला पाठ दाखवत बंड पुकारुन गुवाहाटीला निघून गेलेल्या आमदारांविरोधात आता शिवसैनिकांच्या (shiv sena party workers) मनात रोष निर्माण होताना दिसत आहे. याचा प्रत्यय आज मुंबईत आला. मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे पक्षाचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जावून मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी (shiv sena party workers) प्रचंड रोष व्यक्त केला. याच कारणावरून शिवसैनिकांनी (shiv sena party workers) मंगेश कुडाळकर यांच्या कुर्ला येथील नेहरु नगर येथील कार्यालयावर हल्ला केला.
यावेळी शिवसैनिकांच्या (shiv sena party workers) हातात लोखंडी रॉड होते. शिवसैनिक त्या रॉडने मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या नामफलकावर हल्ला करत होते. यावेळी त्यांनी कुडाळकर यांच्या नावाचं बॅनर फाडलं. तसेच त्यांचा बॅनवरील फोटो देखील फाडण्यात आला. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी (shiv sena party workers) मुंबईत आमदार दिलीप लांडे यांचादेखील बॅनर फाडला.
शिवसैनिकांनी आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर केला थेट हल्ला pic.twitter.com/qCznI30bRh
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 25, 2022
यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर जोरदार टीका केली. “एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनेकडून खासदार आहे. मग सांगा शिंदेंसाठी मी काय कमी केलं? बुडते ती निष्ठा तरंगते ती विष्ठा! काही लोक सांगतायत की (shiv sena party workers), माझ्या आवतीभोवती असणाऱ्या बडव्यांचा त्रास होतोय. आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे. आता मी विठ्ठल आणि इतर बडवे. हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का?”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
हे पण वाचा :
Adani Group च्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 100 टक्क्यांवर रिटर्न !!!
IND vs IRE: आयर्लंडचे ‘हे’ 5 खेळाडू टीम इंडियावर पडू शकतात भारी
‘या’ Multibagger Stocks ने एका वर्षात गुंतवणूकदारांना मिळवून इतके पैसे !!!
टीम इंडियाचा धोखा टळला ! इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज टी 20, वन डे संघातून बाहेर