सातारा प्रतिमिधी I राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आगामी लोकसभा निवडनुकेसाठी उदयनराजेंच्या विरोधात भाजप मधून लढण्यास इच्छुक असलेले माथाडी नेते नरेंन्द्र पाटील यांनी आज शहरातील चंद्रविलास हाॅतेल मधे एकत्र मिसळ खाल्ली. यामुळे सातार्यातील राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या असून या मिसळ चा झनझणीत ठसका उदयनराजेंना बसणार काय असा सवाल उपस्थित झाला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, माथाडी नेते नरेंन्द्र पाटील यांनी आज सातारा येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरातील प्रसिद्ध चंद्रविलास हाॅटेल मधे मिसळ चा आस्वाद घेतला. मात्र पाटील हे सातरचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याने सदर भेटीबद्दल उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.
तसेच शिवेंद्रराजे आणि पाटील यांनी एकत्र मिसळ खाऊन सातारकरांना नक्की काय संदेश दिला हे अजून समजलेले नाही. दरम्यान, ‘आम्ही केवळ मैत्रीखातर भेटलो असून याचा राजकिय अर्थ काढू नये’ असे शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माथाडी कामगारांचे युवा नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव पुढे आले असून त्यांच्या नावावर शिक्कामार्तब होण्याची शक्यता वतर्विली जात आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नेमकी राष्ट्रवादीच्या नेत्यांमधुन काय रणणिती असणार याकडे सर्वाच लक्ष लागुन राहिले आहे. या भेटीमुळे खा.उदयनराजे भोसले यांच्या मनोमिलनात फरक पडणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
इतर महत्वाचे –
उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले
पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक