शिवसेना पक्षात फक्त जनतेची…; आदित्य ठाकरेंचे ट्वीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेकडून पालिका निवडणुकीत विशिष्ट वयोगटातील उमेदवारांनाच तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा होत आहे. याबाबत पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत या चर्चा खोट्या असल्याचे म्हंटले आहे. “शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळते, असे ठाकरे यांनी म्हंटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की,”विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळते.”

राज्यातील महत्वाचे शहर मानले जात असलेल्या मुंबईत सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून कोणाला नगरसेवक म्हणून उमेदवाराची संधी देणार अशा चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेत आता ज्येष्ठांऐवजी तरुणांना संधी देण्याचा विचार असल्याच्याही चर्चा होत होत्या. मात्र या चर्चाना मंत्री आदित्य ठाकरे यांनी पूर्ण विराम दिला आहे.

Leave a Comment