राणेंनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरू झाली; शिवसेनेचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता महाराष्ट्र सरकार हेच आपलं पुढील ध्येय आहे अशी डरकाळी फोडली. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य करत नारायण राणेंवर जोरदार टीका केली. राणें यांनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरू झाली असा चिमटा शिवसेनेनं काढला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल नारायण राणेकृत भाजपच्या बाजूने लागला. 19 पैकी 11 जागांवर भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलने निर्विवाद बहुमत मिळविले. शिवसेनेसह महाविकास आघाडीस 8 जागा मिळवता आल्या. म्हणजे निवडणुकीत घासून टक्कर झाली व निसटता पराभव किंवा निसटता विजय झाला. तरीही भाजपचे ‘पॅनल’ जिंकले. 11 विरुद्ध 8 हा निकाल. यास दणदणीत विजयही म्हणता येणार नाही व दारुण पराभवही म्हणता येणार नाही. असे शिवसेनेने म्हंटल.

जिल्हा बँक राण्यांनी जिंकली हे सत्यच आहे. आता जिल्हा बँकेचा आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा काही संबंध आहे काय? पण जिल्हा बँकेत 11 जागा जिंकून येताच “आता लक्ष्य महाराष्ट्र” अशी आरोळी केंद्रीय मंत्री राणे यांनी ठोकली. जिल्हा बँकेचे पॅनल जिंकल्याने महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्ताबदल होतो, हे वेगळेच अकलेचे गणित यानिमित्ताने समजले. जिल्हा बँक जिंकली म्हणजे जणू जागतिक बँकेवरच विजय मिळवला, असे भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली, तशा महाराष्ट्रातील 31 पैकी बहुसंख्य जिल्हा सहकारी बँकांवर महाविक आघाडीचाच ताबा आहे. रायगडातील जिल्हा बँकेवर मागे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व निर्माण झाले म्हणून शे. का. पक्षाने काही महाराष्ट्रात सत्ताबदलाची भाषा केली नाही, पण राणे यांनी एक जिल्हा बँक कारा जिंकली तर महाराष्ट्र महागता दलवायची भाषा सरू झाली असा चिमटा शिवसेनेने काढला.