हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, असे वाटले होते, तशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, तसे झाली नाही. स्वत: न्यायालयानं याबाबत निर्णय घेणं सोप नाही. न्यायालयाला दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जे सत्य आहे, जे घटनेनुसार आहे, त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला.
संजय राऊत यांच्याकडून आज रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. आज राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमदारांच्या अपात्रेतेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आमच्या दृष्टीनं सगळे आमदार अपात्र आहेत. फक्त त्याच्यावर निवडणूक आयोग आणि न्यायालयाने शिक्कामोर्तब करायचा आहे.
हे घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे हे घटनापीठाला ठरवावं लागले. आम्ही याबाबत स्पष्ट सांगितले आहे की, हे प्रकरण सात न्यामूर्तीच्या खंडपीठाकडे जावं. कारण तावून सुलाखून हे प्रकरण बाहेर पडेल आणि संपूर्ण देशापुढं एक पारदर्श निकाल येईल. भविष्यात कोणीही कोणतही सरकार पैसा, विकत घेतलंलं बहुमत यावर सरकार पाडू शकणार नाहीत, असे राऊत यांनी म्हंटले.
बिहारला महाराष्ट्राची उपमा
यावेळी संजय राऊत यांनी भारला महाराष्ट्राची उपमा दिली जात असल्याचे म्हंटले. ते पुढे म्हणाले की, पूर्वी बिहारमधील गुंडगिरीची उपमा दिली जायची. आता बिहारलाच महाराष्ट्राची उपमा दिली जाते. पूर्वी अशा घटना बिहारमध्ये घडत होत्या. आता बिहारला म्हटलं जातंय, तुमचा महाराष्ट्र झालाय का? ही हत्या साधी नाही. लोक ठरवत असतात, काय हवंय, काय नको. लोकांची भूमिका मांडणारा पत्रकार मारला जातो. त्यामागे कोण आहे, याचा तपास करावा. यात राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप राऊतांनी केला.