मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. दरम्यान या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार की नाही याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली आहे.
“अयोध्येला उद्धव ठाकरे नक्की जातील. शिवसेनेचं या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं जोडलेलं आहे. आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर कऱण्यासाठी शिवसेनेनं मोठं योगदान दिलं आहे. मी काल सांगितलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजेच सरकारचे १०० दिवस झाल्यावरही गेले होते,” असं संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं.
“देशाच्या, हिंदुत्त्वाच्या दृष्टीने भूमिपूजनाचा हा सोहळा ऐतिहासिक आहे. कोरोनाच संकट नसतं तर लाखो रामभक्त तिथे आले असते. पण कोरोनामुळे निमंत्रण देण्यावर बंधनं असून मला मिळालेल्या माहितीप्रमाण १५० लोकांना बोलावण्यात येणार आहे,” असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”