शेतकरी देशद्रोही असतील तर भारतात देशप्रेमी कोण ? संजय राऊतांच्या राज्यसभेत सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असं संत तुकारामांनी म्हटलं आहे. पण आज मात्र जो टीका करेल त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकरी आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, असं शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत म्हटलं. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. मग भारतात देशप्रेमी कोण आहे? असा घणाघाती सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शेतकरी आंदोलनादरम्यान संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी चर्चेत सहभागी होत राऊत यांनी केंद्र सरकारचे कृषी कायदे, शेतकऱ्यांचं आंदोलन, अर्णव गोस्वामी, कंगना रणौत प्रकरणी भाष्य केले.

शेतकरी आंदोलनाची एकजुटता तोडण्यात सरकारला अपयश आलं. हजारो शेतकरी गाझीपूर, सिंघू सीमेवर आपल्या हक्कासाठी लढत आहेत आणि या एकजुटतेमध्ये तुम्हाला देशद्रोह दिसतो. पंजाब, हरयाणाचा शेतकरी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. ही केवळ तीन राज्यांची लढाई नाही… संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबद्दल कळकळ व्यक्त केली.

मग देशप्रेमी कोण?
आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. भारतात देशप्रेमी कोण आहे? अर्णव गोस्वामी देशप्रेमी आहेत का? त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी जाहीर केल्या, अशा गोष्टींना बळ देणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. टीव्ही अँकर एका कॅबिनेट मंत्र्याबद्दल असं बोलतो हे योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले. सरकारला प्रश्न विचारणारे सगळे देशद्रोही आहेत मात्र देशप्रेमी कोण आहे तर अर्नब गोस्वामी, कंगना राणौत? हे देशप्रेमी आहेत का? असा प्रश्न विचारत यांना सरकारनं आश्रय दिल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी गेल्या ३ महिन्यापासून आंदोलन सुरु आहेत. ते तीन राज्यांचं आंदोलन नसून देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. पंजाब जे शेतकरी मुघलांविरोधात लढतात. कोरोना काळात लंगर चालवतात ते तेव्हा ते देशप्रेमी असतात. पंजाबच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केलं तर देशद्रोही कसे झाले? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. आंदोलनही देशाची ताकद आहे, असं संजय राऊत म्हणाले.

कुणी केला तिरंग्याचा अपमान?
लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. पण हा अपमान कुणी केला? त्याला मात्र तुम्ही पकडू शकलेला नाहीत, असा प्रश्न संजय राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केला.

Sanjay Raut's Remarks | Motion of Thanks on the President's Address in Rajya Sabha

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment