‘राणेंची अवस्था ना ‘घर का ना घाट का’; भाजपने कार्यकारिणीतही स्थान दिलं नाही’ शिवसेना नेत्याची टीका

मुंबई । नारायण राणे यांची स्थिती म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. भाजपने त्यांना राज्य कार्यकारिणीतही स्थान दिलेले नाही. या कृतीतून भाजपने राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली.

‘नारायण राणे यांचे काम केवळ बोलघेवडेपणाचे आहे. कावीळ झालेल्यांना जसं पिवळं दिसतं तसं शिवसेनेबद्दल द्वेष, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मत्सर या भावनेने त्यांना पछाडलेले आहे. भाजपनेही राज्य कार्यकारिणीत स्थान न देऊन नारायण राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली, असे राऊत यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांमध्ये नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पूत्र सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. म्हणूनच शिवसेनेकडून नारायण राणेंवर पलटवार होताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”