हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यापासून सलग 3 सभा घेत शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे भाजपनेही मुंबईत सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांच्या सर्व टीकेला आणि आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी 14 मे ला शिवसेनेनही मुंबईत सभेच आयोजन केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करतील. या सभेचा टिझर सोशल मीडियावर शेअर करत शिवसेनेनं विरोधकांना इशारा दिला आहे.
14 मे ला मुंबईत शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर सभा होणार आहे. मुंबईतील बिकेसी मैदानावर संध्याकाळी 7 वाजता शिवसेनेची महासभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती वर भाष्य भाजप आणि मनसेवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सभेपूर्वीच शिवसेनेनं टिझर शेअर करत विरोधकांना इशारा दिला आहे.
शिवसंपर्क अभियान..
दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई pic.twitter.com/WJG687Equn— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 8, 2022
काय आहे या टिझर मध्ये-
हा टिझर फक्त 15 सेकंदाचा असून या टीझर मध्ये सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसतात. मी शिवसेनाप्रमुख जरूर आहे, पण तुमची ताकद माझ्या सोबत आहे म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे अस बाळासाहेब बोलताना दिसत आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या एका सभेतील दृश्य असून कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा ऐकू येत आहेत. बाळासाहेबांवर श्रध्दा असलेल्या प्रत्येक शिवसैनिकाने हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे अस लिहीत या टिझर मध्ये सभेची वेळ आणि तारीख दिली आहे.