मनमोहनसिंगांच्या काळात दोन आंदोलनं झाली, मग मधल्या सात वर्षात देशात सगळं आलबेल आहे का? ; राऊतांचा अण्णांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कृषी कायद्यावरून शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून, दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत असल्याचं भीतीदायक चित्र दिसू लागलं आहे. दुसरीकडे नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अण्णा हजारे यांना आमचा त् प्रश्न आहे, तुम्ही आधी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा आहे हे जाहीर करा आणि मग तुमचं आंदोलन सुरू करा. अण्णा हजारे राळेगणसिद्धीत बसले आहेत. तिथे भाजपाचे नेते प्रस्ताव घेऊ येतायेत. मग तिथे बसून अण्णा तिथे चर्चा करत आहेत. हा प्रस्ताव आला. तो प्रस्ताव आला. कसला प्रस्ताव? एक स्पष्ट भूमिका घ्या. तुम्ही ठरवा, या बाजूला की त्या बाजूला? अस संजय राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, शेतकरी दिल्लीत बसून लढतोय, इथे बसून कशाला प्रस्तावांवर चर्चा करायच्या? अण्णा हजारे यांनी भूमिका घ्यावी. त्यांना अशा प्रकारच्या आंदोलनाचा जास्त अनुभव आहे. मनमोहनसिंग यांचं राज्य असताना दोन आंदोलनं झाली. मग मधल्या सात वर्षात देशात सगळं आलबेल आहे का? माझं लक्ष आहे अण्णांच्या भूमिकेकडे,” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment