काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं चालवतात ; राऊतांचा आठवलेंवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं चालवतात. तसेच त्यांच्याच नावाने संसदेत जातात, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमधील जय भीम फेस्टिव्हलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, देशात दोनच दैवतं आहेत, एक बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. “बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिशा दिली. काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवतात. त्यांच्या नावानं संसदेत जातात. आज देशात विचार आणि माणूस संपवण्याचं काम केलं जातं आहे. त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील. संविधानावर हल्ला होत आहे. स्वातंत्र्य संपत चालले आहे. आता जनता शांत आहे, मात्र 2024 ला जनतेच्या भावनांचा स्फोट झालेला असेल. जगात कोणीही सत्तेचा अमर पट्टा बांधून आला आहे. सद्दाम हुसेन, ट्रम्प पण हरले.”

मी उद्धव ठाकरे यांना नेहमी म्हणतो तुम्ही दिल्लीत गेले पाहिजे. देशात सध्या नेते दिसत नाही. राहुल गांधी एक प्रामाणिक नेता आहे. सत्तेची ताकद आणि पैसा राहुल गांधींचं खच्चीकरण करण्यासाठी वापरला जातोय. काँग्रेस फोडले जात आहे. काँग्रेस नेत्यांनी गांधी आणि काँग्रेसच्या नावावर कोट्यावधी रुपये जमवले. त्यामुळे ते घाबरत आहेत,” असंही संजय राऊत म्हणाले तसेच राज्यकर्ता दिलदार असला पाहिजे असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment