मुंबई । महाविकास आघाडीने आज अखेर राज्यपाल नियुक्त जागांसाठी 12 सदस्यांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत. त्यात शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे आणि काँग्रेसकडून सचिन सावंत आणि मुझफ्फर हुसेन आदी नावांचा समावेश असल्याचं वृत्त आहे.
आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. या यादीनुसार राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि नितीन बानगुडे यांना राज्यपाल नियुक्त सदस्यपदी संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय काँग्रेसने सचिन सावंत, रजनी पाटील, मुझफ्फर हुसेन आणि गायक अनिरुद्ध वनकर यांना संधी देऊन सोशल इंजिनीअरिंग साधण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (urmila matondkar, eknath khadse, anand shinde likely to get mlc)
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in