बुलडाणा जिल्ह्यात शिवशाही बस-ट्रकचा भीषण अपघात

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा प्रतिनिधी । यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड़ा वरुन पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धड़क दिली. या अपघातात शिवशाही बसचे दोन्ही चालक आणि बसमधील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १२ प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी मेहेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरबिड नजिक महामार्गावरील तळेगाव फाट्याजवळ हा अपघात घडला.

ही बस पांढरकवड़ा वरुन पुण्याच्या दिशेनं प्रवाशी घेऊन जात होती. तळेगाव फाट्याजवळून जात असताना या बसला समोरून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रक चालकाचं ट्रक वरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचे समजतं आहे. या भीषण अपघातात बसचे दोन्ही चालक आणि इतर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले. या सर्व जखमींना उपचारसाठी मेहेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात बसचा सगळा चुरा झाला. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही हे मात्र सुदैवच म्हणावं लागेल. या अपघातमुळं वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. पण नंतर पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.