उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबाद जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील खंडोबा मंदिराच्या पुजाऱ्यांवर (priests) जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि अखिल गुरव समाजाच्या वतीने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23 सप्टेंबर रोजी आंदोलन करून करण्यात आली. त्याचबरोबर पुजारी (priests) गजानन किसन जगताप यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या लोकांवर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मागील 21 ऑगस्ट 2022 रोजी मंदिरात किरकोळ वादातून गुरव समाजातील दहा ते बारा पुजाऱ्यांना (priests) गावातील काही समाजकंटकांनी बेदम मारहाण करून जखमी केले होते. अणदूर येथे खंडोबा मंदिरात पुजारी हे वंशपरंपरागत गुरव समाजाचे आहेत. आत्ता एवढ्यात गुरव समाजाने शैक्षणिक व आर्थिक प्रगती केल्यामुळे गावातील काही समाजकंटकांना त्रास उठला आहे. याचा त्रास मनात ठेवून मंदिरातील पुजारांना व श्रीखंडोबा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांना लक्ष करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गुरव समाज दहशतीखाली वावरत असल्याची माहिती गुरव समाजातील मंडळीनी दिली आहे.
या आंदोलनावेळी गुरव समाजाला नाहक बदनाम करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर मंदिरात गुंडागिरी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. तसेच कायमस्वरूपी मंदिरात चार पोलिसांची नेमणूक करण्यात यावी याचबरोबर दर रविवारी निघणाऱ्या छबीना मिरवणुकीच्या वेळी किमान दहा पोलिसांचा बंदोबस्त देण्यात यावा अशी ही मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली.
हे पण वाचा :
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
SSC CGL अंतर्गत 20,000 जागांसाठी बंपर भरती
‘या’ multibagger stock ने फक्त 25,000 रुपयांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये