हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा सरकारच्या नावाखाली जे घडत त्याचा कोणालाच थांगपत्ता नसतो. असेच काहीसे भोपाळ मधील नॅशनल हायवेवर घडलं आहे. एका शेतकऱ्याने चक्क रिकाम्या जागेत ५ किलो सोयाबीन पेरल आहे. हायवेच्या डिव्हायडर च्या भागात चक्क त्याने शेती करून प्रशासनाला जागे केले आहे. हि गोष्ट जेव्हा प्रशासनाला समजली तेव्हा प्रशासन सुद्धा हैराण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एनएचआय बैतुल ते भोपाळ या हायवेचे काम सुरु होते. त्यावेळी तहसीलदाराने सोयाबीन ची रोपे पाहिल्यानंतर चकित झाले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता . हायवेमधला भाग हा जवळपास १० फूट रुंद आणि ३०० फूट लांब इतके अंतर आहे. हि शेती भोपाळ मधील लल्ला यादव या व्यक्तीने केली आहे.
लल्ला यादव याची चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले कि, काही दिवसांपूर्वी एका कंपनीला झाडे लावायची होती. पण बरेच दिवस झालं तरी ती कंपनी झाडे लावत नव्हती . इतके मोठे श्रेत्र रिकामे होते त्याचा फायदा घेत मी इथे सोयाबीन पेरले. काही दिवसानंतर हे सोयाबीन चागले आल्यावर त्याची काळजी घेऊ लागलो. काही दिवसांनी हे सोयाबीन काढायला येल. जवळपास असलेले ५ किलो सोयाबीन या ठिकाणी पेरल आहे. असेही त्याने सांगितले. या प्रकारांची चौकशी केली जात आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in