धक्कादायक ! पेट्रोल न दिल्याने तरुणाला पेटवले

औरंगाबाद – दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असे असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर येत आहे, दुचाकी तील पेट्रोल देण्यास नकार दिल्याबद्दल मित्रांनीच तरुणाचा अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शहरातील गारखेडा परिसरात मोतीनगर भागात घडली आहे. या घटनेत दिनेश देशमुख (31, रा. मोतीनगर) हा गंभीररीत्या भाजला आहे.

या विषयी अधिक वृत्त असे की, वाहन चालक दिनेश हा 19 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी घरातील काम आटोपून बाहेर पडला. तेव्हा त्याचा मित्र किरण बालाजी गाडगे त्याच्या घराजवळ आला. त्यानंतर दोघेही दारू पिण्यासाठी किरणच्या अड्ड्यावर गेले. त्या ठिकाणी दारू पिल्यानंतर दोघेही दिनेशच्या घराजवळील रिकाम्या प्लॉटवर आले. दुपारी एक वाजेच्या सुमारास नितीन सोनवणे व भागवत गायकवाड तेथे आले. नितीनने दुचाकीसाठी थोडी पेट्रोल दिनेशकडे मागितले. दिनेशने त्यास पेट्रोल देण्यास नकार दिला. मात्र, किरण च्या सांगण्यावरून दिनेशने नितीन ला दुचाकीची चावी देत पेट्रोल काढण्यास सांगितले. नीतीनने पेट्रोल काढल्यानंतर आणखी पेट्रोलची मागणी केली. तेव्हा दिनेशने नकार दिला.

याचा राग आल्याने भागवत ने चिथावणी देत नितीन ला त्याच्या अंगावर पेट्रोल पेरण्या सांगितले नितीन नी पेट्रोल फेकताच किरणे माचिसची पेटवलेली काळी त्याच्या अंगावर फेकली. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या दिनेशला कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात या विषयी गुन्हा दाखल करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटाने तपास करीत आहेत.

You might also like