हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजलेला आहे. या कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसागणिक वाढतच चालले आहे. अशा या प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत सर्वसामान्यां बरोबरच अनेक सेलिब्रिटींना देखील आपले प्राण गमवावे लागले आहेत. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे.
प्रसिद्ध अमेरिकन गायक ख्रिस ट्रोसडेल याचा नुकताच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तो ३४ वर्षांचा होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या ख्रिसला २१ मे रोजी कॅलिफोर्नियातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्ब्ल १२ दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याच्या शरीराने या उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि अखेर दोन जूनला ख्रिसची प्राणज्योत मालवली.
It is with a heavy heart that we confirm the passing of Chris Trousdale on June, 2, 2020 from an undisclosed illness. He was a light to so many and will be missed dearly by his family, friends and fans all over the world. pic.twitter.com/Wlb4qxrF5F
— Chris Trousdale (@OfficialCRT) June 3, 2020
ख्रिस ट्रोसडेल हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध गायक तसेच संगीतकार होता. बायबँड या प्रसिद्ध म्युझिक ग्रुपमधून त्याने संगीतातील आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘इट हँपन एव्हरी टाईम’, ‘डान्स फॉर लव्ह’, ‘गॉट गेट द गर्ल’, ‘विथ ऑल माय हार्ट’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी त्याने गायली आहे.
तसेच गाण्यासोबत तो अभिनयक्षेत्रातही काम करत होता. ‘डेज ऑफ आर लिव्ह्स’, ‘शेक इट अप’, ‘ऑस्टिन अँड अॅली’, ‘लुसिफर’ यांसारखा काही टीव्ही मालिकांमध्येही त्याने काम केले होते. ख्रिसच्या मृत्यूमुळे अमेरिकन संगीतक्षेत्रात एकच शोककळा पसरली आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.