“केलेल्या पापांची याच जन्मात फळं भोगावी लागतील”; अभिनेत्याने केली सलमानवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अभिनेता कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने सलमान खानवर निशाणा साधला आहे. सलमानने शेती करतानाचा एक फोटो ट्विट केला होता. या फोटोवर त्याने उपरोधिक टोला लगावला आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने देशातील शेतकऱ्यांना सलाम करण्यासाठी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये सलमान चिखलाने माखलेला दिसत आहे. या फोटोची कमाल खानने खिल्ली उडवली आहे. “आता रडून काय फायदा? जी पापं केली आहेस त्याची फळं तुला भोगावीच लागतील.” असं ट्विट त्याने केलं आहे. कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सलमानच्या चाहत्यांनी कमाल खानवर जोरदार टीका केली आहे.

कमाल खानने यापूर्वी देखील सलमानवर निशाणा साधला होता. त्याने सलमानचे विकिपिडिया पेज पोस्ट करुन त्याची खिल्ली उडवली होती. सलमान खान बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर आजवर अनेक कायदेशीर खटले देखील दाखल करण्यात आले आहेत. या खटल्यांचे संदर्भ त्याच्या विकिपिडिया पेजवर देखील पाहायला मिळतात. या पेजचे काही स्क्रिन शॉट पोस्ट करुन कमाल खानने सलमानची खिल्ली उडवली होती. “सल्लूचं हे Wikipedia पेज पाहा याला अभिनेता म्हणावं की….” अशा आशयाचं ट्विट केआरकेनं केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.