देशात आत्तापर्यंत २९०२ कोरोनाग्रस्त, ६८ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोव्हीड-१९ चे २६५० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २९०२ पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे.भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.१८३ बरे झाले अथवा सोडण्यात आले. एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणात माइग्रेटेड पेशंटचा देखील समावेश आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी ३ एप्रिल रोजी राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधी (एसडीआरएफएफ) अंतर्गत आइसोलेशन वार्ड तयार करण्यास आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उर्वरित सुविधांसाठी ११,०९२ कोटी रुपये जाहीर करण्यास सर्व राज्यांना मान्यता दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आश्वासनानंतर या रकमेला परवानगी देण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, आइसोलेशन सुविधा तयार करणे, नमुने गोळा करणे आणि तपासणी करणे, अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळे बांधणे, आरोग्य, महानगरपालिका, पोलिस आणि अग्निशमन कर्मचारी, थर्मल स्कॅनर, व्हेंटिलेटर, एअर प्यूरिफायर इत्यादींसाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणे खरेदी करणे इ.साठी हि रक्कम वापरली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे