हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे प्रेक्षकांना महाभारत ही मालिका पुन्हा एकदा पाहता येत आहे. २८ मार्चपासून दुपारी १२ व संध्याकाळी सात वाजता ही मालिका डीडी भारतीवर प्रसारित होत आहे. या मालिकेतील कलाकार पाहून त्यांना किती मानधन मिळत असेल ? असा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल. मात्र या कलाकारांच मानधन पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला एका एपिसोड साठी 3 हजार रुपये मानधन मिळायचे. महाभारत या मालिकेतील बहुतांश कलाकार हे नवोदित असल्याने त्यांचं मानधन समानच ठेवण्यात आलं होतं.
महाभारत ही मालिका छोट्या पडद्यावरील ही सर्वोत्तम मालिका समजली जायची. टीआरपीचे सर्व विक्रम या मालिकेने मोडले. केवळ भारतातच नाही तर युके आणि इतर देशांमध्येही ही मालिका लोकप्रिय होती.
‘महाभारत’च्या संपूर्ण स्टारकास्टला एका एपिसोडसाठी फक्त तीन हजार रुपये मानधन मिळायचे. ही रक्कम ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल कारण आताच्या मालिकेतील कलाकार कोट्यवधींमध्ये कमाई करतात. छोट्या कलाकारांनाही आता लाखभर रुपये मानधन मिळतं. मात्र त्यावेळी एका एपिसोडसाठी तीन हजार रुपये ही रक्कम काही छोटी नव्हती.
तब्बल १५ हजारांहून अधिक लोकांनी या मालिकेत विविध भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यापैकी फक्त १५०० लोक शॉर्टलिस्ट केले गेले आणि स्क्रीन टेस्टसाठी बोलावले गेले. ही मालिका बनवण्यासाठी 9 कोटी रुपयांचा खर्च आला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.