हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचे संकट जगभरात गडद झाले आहे. अनेक भागातील प्रशासकीय अधिकारी डॉक्टर्स यांनी या काळात मोलाचे सहकार्य केले आहे. डॉक्टरांना तर लोकांची देवदूतच म्हंटले आहे. अनेक वेळा डॉक्टरांनी अडचणीच्या काळात मदत केली आहे. समाजात डॉक्टरांना अनेक मान सन्मान मिळतोय. कोरोनाच्या काळात त्याच्या या कामाचे तर सर्व स्तरातून कौतुकच केले जात आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एका डॉक्टर महिलेले आपले बिकनी मधले काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणावरून तिच्यावर टीका केली जात आहे.
डॉक्टर कँडिस मेहरे असे त्या महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षपासून त्या अमेरिकेत डॉक्टर म्हणून काम करताहेत. परंतु त्याच्या बिकनी मधील फोटो मुळे त्यांना अनप्रोफेशनल डॉक्टर असा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला आहे. त्या क्रित्येक वर्षापासून समुद्र किनारी भागात आपली सर्व्हिस देत आहेत. अमेरिकन सरकारं कडून त्यांना समुद्राच्या भागात ड्युटी दिली आहे. त्यामुळे त्या बिकनीवर असतात. त्यांनी आत्तापर्यन्त समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेल्या बेशुद्ध लोकांवर उपचार केले आहेत. तसेच काही कारणास्तव इजा झालेल्या तसेच खूप हाय रिस्क असलेल्या लोकांवर त्यांनी समुद्र किनारी उपचार केले आहेत. त्यामुळे त्या प्रसंगातून वाचलेली लोक त्यांना देवदूतच म्हणतात.
सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करत म्हंटले आहे कि, हे काम म्हणजे डॉक्टर लोकांना बेइज्जत करण्याचं काम आहे. त्यांचं असं वागणं हे कोणत्याही डॉक्टरला शोभणारे नवे अनप्रोफेशनल काम अशी टीका केली आहे. या टीकेवर उत्तर देताना त्या म्हणतात कि, ‘ जेव्हा तुम्ही समुद्र किनारी संकटात सापडलेले असतात त्यावेळी मात्र मी तुम्हाला मदत करते मी तुमचे प्राण वाचवते असे सडेतोड उत्तर दिले आहे. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. कारण मी अनेक जणांचे जीव वाचवले आहेत. आणि मी हे काम कायमस्वरूपी करणार आहे. त्याच्या या पोस्ट ला खूप जणांनी लाइक आणि शेअर केले आहे. २,५८,००० पेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. त्याचे ३३ हजार पेक्षा जास्त फोल्लोवॉर्स आहेत. त्याच्या या गोष्टीमुळे सोशल मीडियावर #medbikani हा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यानंतर अनेकींनी आपले बिकनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.