म्हणुन प्रशासनाने स्वत: 1 हजार 800 लिटल भेसळीचे दूध केले नष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी |  बाजारात विक्रीसाठी आलेले भेसळीचे 1800 लिटर दूध पंढरपूर जवळ नष्ट करण्यात आले. ही कारवाई सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने केली. भेसळ रोखण्यासाठी अनेक कडक कायदे करून दूध माफिया सर्व सामान्य लोकांच्या जीवांशी खेळत असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील शेगाव येथील सांबकांथा या खासगी दूध डेअरीवर कारवाई केली आहे.

सांगली जिल्ह्यातून एक निळ्या रंगाचा आयशर टेम्पो (क्रमानं एम एच ०९ सी यू ०००७ ) मधून भेसळ केलेले दूध घेऊन पंढरपूर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. तपासणी दरण्यान साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर ली या पेढीची तपासणी केली. असता भेसळीचे दूध स्वीकारत असल्याचे दिसून आले.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कारवाई वेळी सादर पेढीत संशयित भेसळीचे अंदाजे १०० लिटर दूध स्वीकारल्याचे व टेम्पोत संशयित भेसळीचे अंदाजे १८८० लिटर उपलब्ध होते. सदर संशयित भेसळीच्या दोन्ही दुधाचे नमुने विश्लेषणाकरिता घेऊन उर्वरित साठा जन आरोग्याचा विचार करून जागेवरच नष्ट केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.