हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस साथीच्या काळात जेथे अनेक देशांमध्ये सरकारे आणि राजकारण्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे, तेथे दक्षिण कोरियामधील सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत पुन्हा जनतेने निवडून दिले आहे. कोरोना या साथीच्या दरम्यान झालेल्या संसदीय निवडणुकीत दक्षिण कोरियाच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांना जनतेने विक्रमी बहुमत दिले आहे.
कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी दक्षिण कोरिया सरकारने केलेल्या प्रयत्नांना जनतेने पूर्ण गुण दिले आणि पूर्ण बहुमताने पुन्हा त्यांच्या बाजूने विश्वास व्यक्त केला.डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या अध्यक्ष मून जे इन यांच्या सत्ताधारी युतीने ३०० जागांच्या राष्ट्रीय असेंब्लीमध्ये एकूण १८० जागा जिंकल्या आहेत तर डेमोक्रॅटिक पक्षाने १६३ जागा जिंकल्या आहेत तसेच सहयोगी उपग्रह पक्षाने १७ जागा जिंकल्या आणि दक्षिण कोरियाचा प्रमुख विरोधी पक्ष युनायटेड फ्यूचर पार्टीला १०३ जागा मिळाल्या आहेत.
१९८७ मध्ये दक्षिण कोरियामध्ये लोकशाही सुरू झाल्यापासून कोणत्याही पक्षाला असा जनादेश मिळालेला नाही आहे.१९९२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७१.९ टक्के मतदानानंतर प्रथमच देशात ६६.२% मतदान झाले.
बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आणि कोरोनाच्या सावटाखालीदेखील लाखो लोक मतदानासाठी घराबाहेर पडले. अशा संवेदनशील प्रसंगी घेण्यात येणाऱ्या निवडणूकीसाठी सरकारने मतदारांसाठी खास तयारीही केली होती.मतदान केंद्रावर मतदारांना मास्क, हातमोजे आणि हॅन्ड सॅनिटायझर्स देण्यात आले.तसेच, मत देण्यापूर्वी प्रत्येकाचे तापमान देखील तपासले गेले.ज्यांचे उच्च तापमान दिसून आले त्यांना बाहेर स्वतंत्र मतदान केंद्रावर नेले गेले आणि मतदान केले गेले. मतदानानंतर बूथची स्वच्छता करण्यात आली.तसेच सोशल डिस्टंसिंगची पूर्ण काळजीही घेतली गेली. एक एक मीटर अंतरावर उभे राहण्यासाठी गोल बनविले गेले होते, त्या सर्वांनी त्यात उभे राहून त्याचे पालन केले.
मतदानाची वेळ संपल्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या सुमारे १३,००० लोकांनाही मतदानाची संधी मिळाली. परंतु केवळ त्यांनाच मतदानाची परवानगी मिळाली ज्यांना क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत.
साथीच्या आधी राजकीय तज्ज्ञ दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून यांची निवडणूक जिंकण्याची शक्यता नाकारत होते. रोजगार, भत्ता आणि उत्तर कोरियाच्या अणुप्रक्रियेच्या मुद्दय़ावर मून राजकीय आघाडीवर झगडताना दिसले.२०१९ मध्ये, सुस्त आर्थिक गतीमुळे त्यांचे अप्रूवल रेटिंग ३० टक्क्यांपर्यंत खाली आले होते. परंतु कोरोना साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी मूनने ज्या प्रकारे कामगिरी केली त्याद्वारे त्यांच्या अप्रूवल रेटिंगला ४१ टक्के ते ५७ टक्के वाढ मिळाली.
दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी आणि देशातील फार्मा कंपन्यांना बळकट करण्याची संधी म्हणून मून यांनी कोरोना आपत्तीकडे पहिले आहे. त्याच वेळी, कोरोनाशी लढतानाच्या मूनच्या रणनीती आणि अंमलबजावणीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कौतुक केले गेले. दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत १०,६०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २२९ लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष गोष्ट अशी आहे की संसर्गग्रस्त असूनही हजारो लोकांनी निवडणुकीत भाग घेतला आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.