नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्यातील संघर्षानंतर सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलेला नाही, घुसखोरी केलेली नाही’ या वक्तव्याला विरोधकांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर यावं आणि चीनच्या घुसखोरीबद्दल खरं काय आहे ते सांगावं, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे केलं आहे. ‘पंतप्रधानजी, देशाला तुमच्याकडून सत्य ऐकायचंय’ असं एका व्हिडिओ पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं. ‘चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलाय आणि आम्ही त्यावर कारवाई करत आहोत, असं पंतप्रधानांनी न घाबरता सांगावं. या परिस्थितीत संपूण देश तुमच्यासोबत आहे’ असं पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हटलं.
या व्हिडिओत राहुल गांधी म्हणाले कि, ‘संपूर्ण देश एकत्रितपणे सरकारसोबत उभा आहे. परंतु, एक प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की हिंदुस्तानात कुणीही घुसखोरी केलेली नाही, आपल्या जमिनीवर कुणीही ताबा मिळवलेला नाही. परंतु, सॅटेलाईट फोटो काही वेगळंच सांगत आहेत. सेनेचे माजी जनरल बोलत आहेत तसंच लडाखचे रहिवासी सांगत आहेत की आपली जमीन एका ठिकाणी नाही तर तीन ठिकाणी चीनकडून बळकावण्यात आली आहे’ असं राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हणाले.
‘तुम्हाला खरं बोलावंच लागेल. घाबरण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही म्हटलं की जमीन गेलेली नाही आणि चीननं जमिनीवर ताबा मिळवला असेल तर यामुळे चीनचा फायदा होईल. आपल्याला सोबत या प्रश्नाला लढा द्यायचा आहे आणि निकालात काढायचाय’ असं आवाहनही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केलं. ‘आपल्या शहीद जवानांना हत्यारांशिवाय सीमेवर कुणी आणि का पाठवलं?’ असाही प्रश्न पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधींच्या या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा काँग्रेसचा यातून प्रयत्न दिसून येत आहे.
प्रधानमंत्री जी,
देश आपसे सच सुनना चाहता है।#SpeakUpForOurJawans pic.twitter.com/tY9dvsqp4N
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 26, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”