पोटापाण्याची गोष्ट | SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांपेक्षा जास्त पदावर भरती होणार असून ती प्रक्रिया चालू झाली आहे. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा ११ फेब्रुवारी पासून ११ मार्च पर्यंत आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) ७६,५७८ जागा भरण्यासाठी मोठे भरती अभियान चालू केले आहे. ज्यामध्ये ७,६४६ पदे महिलांसाठी राखीव आहेत.
गृहमंत्रालयाने सांगितले की, एकूण पदांमध्ये ५४,९५३ जागा या कॉन्स्टेबल (SSC GD) पदासाठी ‘कर्मचारी निवड आयोगा’द्वारे (SSC) भरती होईल. यामधील २१,५६६ पदे ही CRPF साठी, १६९८४ BSF, ८५४६ SSB, ITBP साठी ४१२६ तर आसाम रायफलसाठी ३०७६ जागा आहेत. उरलेल्या जागा या CISF आणि CAPF साठी आहेत. SSC द्वारे या महिन्यात कॉम्पुटर आधारित परीक्षा घेतली जाईल.
मंत्रालयाने सांगितले की, सिएपीएफ मध्ये उपनिरीक्षक पदासारखे १०७३ पद असे आहेत, ज्यामध्ये ३८ पदे महिलांसाठी राखीव आहेत. बीएसएफ मध्ये उपनिरीक्षक पदासाठी सर्वात जास्त ५०८ जागा आहेत. सीआरपीएफ मध्ये २७४, एसएसबी मध्ये २०६ तर आयटीबीपी मध्ये ८५ पदे आहेत. एसएससीच्या माध्यमातून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल.
SSC GD च्या ५४ हजार ९५३ पदांची भरती ‘कर्मचारी निवड आयोग’ ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या दरम्यान घेईल. त्यासाठी हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे. ज्या उमेद्वारांनी अर्ज केले होते, त्यांनी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करावे.
डायरेक्ट डाउनलोड करा –
SSC GD Admit Card 2019
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
सर्वोच्च न्यायालयाचा ‘निमलष्करी दलांना’ मोठा दिलासा, मिळणार हे लाभ
इंजिअरिंगीची डिग्री किंवा डिप्लोमा झालेल्या उमेद्वारांसाठी सुवर्ण संधी !
बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी CISF मध्ये ४२९ जागांची भरती