सीमाभागातील लोकांसाठी सरकार कल्याणकारी योजना राबवणार; राज्यपाल बैस यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली. प्रथम राज्यपाल नवनिर्वाचित महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषण केले. यावेळी राज्यपाल बैस यांनी सीमाभागातील लोकांसाठी सरकार कल्याणकारी योजना राबवणार असल्याची मोठी घोषणा केली.

राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषनावेळी राज्यपाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची उपस्थिती होती. यावेळी राज्यपाल बैस म्हणाले की, आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होत आहे. राज्य सरकारच्यावतीने अनेक योजना सर्वसामान्यांसाठी आखण्यात आलेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे सिमभागतील लोकांसाठी राज्य सरकारच्या विविध योजना असून 75 हजार युवकांसाठी राज्यात विविध क्षेत्रात नोकर भारती सुरू केली आहे. सीमाभागातील लोकांसाठी सरकार कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जानेवारी 2023 मध्ये 1 लाख 35 हजारांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आलेले आहेत. तसेच मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजनाही कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. युवकांसाठी गडचिरोली, गोंदियामध्ये प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. पेन्शन योजनेतही राज्य सरकारकडून बदल करण्यात आले असून मैत्री योजनेतून अनेक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.

मा. राज्यपाल यांचे अभिभाषण ( अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ )

सरकारने मेट्रोच्या अनेक नव्या योजना हाती घेतल्या आहेत. विशेष करून मुंबईकरांसाठी आपला दवाखाना योजना राबवली. छ. शिवाजी महाराज टर्मिनसपासून मेट्रो प्रकल्प सुरु केला आहे. तसेच सी-लिंकचं काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे. माझ्या सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार डिप्लोमा आणि इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून अभ्यास करण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी मराठीतून अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे राज्यपाल बैस यांनी म्हंटले. तब्बल 13 विधेयके या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली जाणार आहे. 4 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक मुद्दे उपस्थित केले जाणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘हे’ मंत्री कामकाज पाहणार

1) माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास- उदय सामंत

2) सार्वजनिक बांधकाम -शंभूराज देसाई

3) मृदू व जनसंधारण – दादा भुसे

4) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य -संजय राठोड

5) मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन – तानाजी सावंत

6) अल्पसंख्यांक विकास- अब्दुल सत्तार

7) पर्यावरण व वातावरणीय बदल- दीपक केसरकर

8) माहिती व जनसंपर्क- संदिपान भुमरे

9) सामान्य प्रशासन, परिवहन -गुलाबराव पाटील