हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने भरत देशात शिरकाव केला असून आता गुजरातमध्येही त्याचा रुग्ण आढळून आला आहे. गुजरातमधील जामनरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र सरकारकडूनही विशेष खबरदारी घेतली जात आहे. ओमिक्रोनच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी शंका उपस्थित होत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात ओमिक्रोनचा रुग्ण नाही. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊनबाबत निर्णय नसल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, राज्याचे तीन दिवसांपूर्वी परदेशातून गुजरातमध्ये आलेल्या 11 लोकांना आरटीपीआरनंतर क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी एका 72 वर्षीय व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचे स्वॅब ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. 72 तासानंतर या व्यक्तीचा अहवाल आल्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्याबाबत शंका करण्याचे काहीच कारण नाही. कारण महाराष्ट्रात ओमिक्रोनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
राज्यात जरी ओमिक्रोनचा रुग्ण आढळलेला नसला तरी लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊन टाळायचे असेल तर लोकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावे. लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. राजेश टोपे यांनी केले आहे.