हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज्य सरकारच्यावतीने अनेक घोषणा करण्यात आल्या. यावेळी राज्यातीळ युवकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पोलीस भर्तीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील महत्वाची घोषणा केली. “पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगीतले.
मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला. अमरावती हिंसाचाऱ्याच्या घटनेवरून विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान शेवटच्या दिवशी गृह विभाग आणि पोलीस दल यांसदर्भातील पार पडलेल्या चर्चेवेळी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली.
सध्या राज्यात पहिल्या टप्प्यातील 5 हजार 200 पदांची भरती सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील 7 हजार पोलीस भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. राज्यातील पोलिसांची संख्या कमी आहे. आम्ही पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात निर्णय घेऊन पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.