गुप्तचर विभागाने एकनाथ शिंदेच्या बंडाची दोन महिन्यांपूर्वीच दिली होती कल्पना, मात्र…

Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर संकट आले आहे. दरम्यान या संकटाची कल्पना हि गुप्तचर यंत्रणेने दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. मात्र, ठाकरे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही दुर्लक्ष केल्यामुळे आज सरकार कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘एसआयडी’ अर्थात गुप्तचर विभागाकडून राज्यातील संभाव्य घडामोडींवर लक्ष ठेवणे, राजकीय घडामोडी आणि हालचाली, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायाबद्दल आगाऊ सूचना देणे हे काम केले जाते. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सरकारवर मधील शिवसेना नेत्यांच्या भाजप नेत्यांशी होणाऱ्या संवादाबाबतची माहिती सरकारला दिली होती.

मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा अंदाज घेण्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरले आहे. एसआयडीने काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत एसआयडीच्या मदतीने काहीतरी पावले उचलणे गरजेची होती.