नवी दिल्ली । परिसरापासून आपण कमी अंतरावर राहत असू, तरीही टोल आकारला तर गाडी चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. टोलनाक्यापासून जवळ राहणाऱ्या व्यक्तींना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सूट दिलेले अंतर किती आहे? व कोणासाठी आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत.
सरकार सध्या कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत आहे. यामुळे टोलनाकेही सध्या कॅशलेस होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे सर्व वाहनांना फोस्टाग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांवर फॉस्टाग नसेल त्या वाहनांना टोल टॅक्स सोबतच पेनल्टी आणि दुप्पट टॅक्स वसूल केला जाणार आहे. टोलमध्येही काही प्रमाणात फॉस्ट्याग वाहनांना सूट देण्यात येणार आहे.
अनेक वेळा टोल पासून जवळच्या परिसरात राहणाऱ्या वाहनचालकांकडूनही टोल आकारला जातो. यामुळे नेहमी टोलनाक्यावरती वाद-विवाद होत असतात. पण टोलनाक्याच्या दहा किलोमीटर परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्यांच्या वाहनावर टोल द्यावा लागत नाही. अशा टोलमधून त्यांची सुटका होऊ शकते. येत्या काळामध्ये वाहनावर पोस्टिंग लावणे बंधनकारक होणार आहे. यामुळे वाहनांना टोलच्या रांगेत गाडी खूप वेळ उभा करावी लागणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”