नवी दिल्ली । साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी शेअर बाजार ग्रीन मार्कवर बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) निर्देशांक 222.13 अंकांच्या वाढीसह 51,531.52 च्या पातळीवर बंद झाला. याखेरीज एनएसईचा निफ्टी (NSE Nifty) निर्देशांक 66.80 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 15173.30 वर बंद झाला. याशिवाय मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तसेच निफ्टीमध्येही खालच्या पातळीवरून वसुली झाली.
घसरण झालेले शेअर्स
BSE च्या टॉप 30 शेअर्स विषयी बोलायचे झाल्यास, आज 14 स्टॉक्स रेड मार्कवर बंद झाले आहेत. आज Titan चा समावेश अडीच टक्क्यांच्या घसरणीने टॉप लूजर्स च्या लिस्ट मध्ये झाला आहे. याशिवाय LT, HDFC Bank, ITC, ONGC, SBI, HDFC, Infosys, ICICI Bank, TCS, Asian Paints, IndusInd bank आणि Bajaj Finserv यांची विक्री झाली आहे.
तेजीत असणारे शेअर्स
या व्यतिरिक्त जर तुम्ही गेनर्स स्टॉक्सची चर्चा केली तर या लिस्ट मधील Reliance 4 टक्के वाढीसह बंद झाला आहे. या व्यतिरिक्त Sun Pharma, Bajaj Finance, Nesle India, HUL, HCL Tech, TechM, Axis Bank, Bajaj Auto, NTPC, Maruti, Kotak Bank आणि Dr. Reddys ग्रीन मार्कवर बंद झाले आहेत.
सेक्टरल इंडेक्समध्ये ट्रेडिंग कसे होते
सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलताना, आज दिवसभरात संमिश्र व्यवसाय दिसला. बीएसई ऑटो, बँक निफ्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स,कॅपिटल गुड्स, बीएसई आयटी आणि पीएसयू क्षेत्रात विक्रीचे वर्चस्व राहिले. याशिवाय एफएमसीजी, हेल्थकेअर, मेटल, तेल आणि गॅस तसेच टेक सेक्टर्स तेजीत बंद झाले आहेत.
स्मॉलकॅप-मिडकॅप इंडेक्स
>> बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 205.94 अंकांच्या वाढीसह 19626.01 च्या पातळीवर बंद झाला आहे.
>> बीएसई मिडकॅप इंडेक्स 88.35 अंकांच्या वाढीसह 19898.48 च्या पातळीवर बंद झाला.
>> सीएनएक्स मिडकॅप इंडेक्स 41.60 अंकांच्या वाढीसह 22968.10 च्या पातळीवर बंद झाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.