तेल लावलेल्या पैलवानाची हरलेली कुस्ती ‘चेकमेट’मधून वाचकांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घटना घडल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाच्या दाव्यांवरून आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री शपथ घेण्यापर्यंत अनेक राजकीय वळणे महाराष्ट्राने बघितली आहेत. या काळात कोणत्याच पक्षाला बहुमत सिद्ध न करता आल्याने अध्यक्षांचे नियम ही लागू करण्यात आले होते. बऱ्याच चर्चा, वादविवाद आणि टीकेनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. संपूर्ण राज्याचे लक्ष हे त्यांच्या शपथविधीवर लागले होते. या मधल्या काळात पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी कट्टा न्यूज च्या माध्यमातून आपल्या विश्वसनीय स्रोतांकडून सर्वांच्या आधी नेमक्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.  

पहाटे झालेल्या या शपथविधीची इनसाईड स्टोरी तुम्हाला चेकमेटमध्ये वाचायला मिळेल.

या सर्व बातम्या अगदी खऱ्या होत्या. निवडणुकीच्या या काळात राज्याच्या राजकारणाच्या विश्वासार्ह बातम्यांसाठी सुधीर सूर्यवंशी यांच्या बातम्यांकडे पाहिले जात होते. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या खोट्या असल्याचेही काहींनी म्हंटले पण त्या अगदी खऱ्या सिद्ध झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील या बातम्यांच्या मालिकेचे पुस्तक रूपांतर करण्यात आले असून नुकतेच ते ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आले आहे. CHECKMATE – How the BJP won and lost Maharashtra असे या पुस्तकाचे नाव असून पेन्गवीन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. 

आघाडी सरकारच्या स्थापनेचा इतिवृत्तांत या पुस्तकात असल्याने ऑनलाईन या पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुधीर सूर्यवंशी हे कट्टा न्यूज च्या माध्यमातून ट्विटर वर विविध बातम्या प्रसिद्ध करीत असतात. त्यांच्या या ठाकरे सरकारच्या स्थापनेच्या काळातील बातम्यांची मालिका चांगलीच गाजली होती. आता पुस्तकरूपात एकत्रित हा सर्व वृतान्त वाचकांना अनुभवता येणार आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून या पुस्तकाला पसंती दर्शविल्याबद्दल सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या वाचकांचे आभार मानले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like