हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आज खूप वादळी आणि चर्चेचा ठरला. आज अनेक नेत्यांनी धक्कादायक खुलासेही अधिवेशनाच्या भर सभागृहात केले. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांचे नाव घेतले. सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवारांनीही आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी विधान केले.
राज्याच्या विधीमंडळात एकनाथ शिंदे सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या टोलेबाजीला उत्तर देताना भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. खरंतर अजित पवारांचे अभिनंदन केले पाहिजे त्यांनीही आम्हाला मदत केली आहे. आज जी सत्ता आली आहे.
ती सत्ता येत असताना अजित पवारांना धन्यवाद दिले पाहिजे त्यांनी यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली. पण आजच्या भाषणात मात्र तुम्ही इकडे गेलात आता तुम्ही कसे निवडून याल? असे विचारतात. पण इकडून तिकडे गेल्याने पराभूत होत नाही, तुम्ही गेले नाहीत म्हणून उपमुख्यमंत्री झाले नाहीत. पण हे लक्षात ठेवा कधीतरी अशी उडी मारावी लागते, हे कायम लक्षात ठेवा, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले.