हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी व विरोधक पक्षातील नेत्यांची टोलेबाजी रंगली. अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी पवारांना टोला लगावला. “अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय येऊन आमच्या कानात सांगा. मात्र, जयंत पाटील यांच्या कानात सांगू नका,असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीस अध्यक्षपदाची निवड करण्यात आल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी अध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी टोलेबाजी चांगलीच रंगली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, या सभागृहाचं कामकाज उत्तम होण्यासाठी आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा देऊ शकतील. उरलेले इतरही देतील अशी आम्हाला आशा आहे.
जर राहुल गांधी यांचा साधा आदेश आला की तुम्ही झोपता पण या नवीन विधानसभा अध्यक्ष बनलेल्या राहुल गांधींचं ऐकाल, अशी आम्हाला आशा आहे. जावई हा देवासमान असतो ही आपल्या शास्त्रातील भावना आहे. त्यामुळे वरील सभागृहात काही अडणार नाही असा मला विश्वास आहे,” असे मुंनगंटीवार म्हणाले.