Monday, January 30, 2023

भास्कर जाधवांनी तटकरेंना ‘शुभेच्छा’ देताच सुप्रिया सुळेंनी जाधवांना दिली ‘ही’ मोठी ऑफर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी दिल्लीच्या संधीवरुन भास्कर जाधवांनी तटकरेंना ‘शुभेच्छा’ दिल्या असता खासदार सुप्रिया सुळे यांनीही भास्कर जाधवांना थेट दिल्लीची म्हणजेच कोकणातून खासदारकी लढवण्याची ऑफर दिली.

सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळी भास्कर जाधव यांनी त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, तटकरे आणि आपला प्रवास सारखाच आहे. आमचा पाठशिवणीचा खेळ आहे. दोघांनी सारखीच पदं भूषवली. पण आता तटकरे दिल्लीत आहे, मात्र मला दिल्लीची संधी दिसत नाही.

- Advertisement -

भास्कर जाधव यांनी मनातील इच्छा व्यक्त करत केंद्रात जाण्याची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना थेट ऑफरचं दिली. “कोकणातून दोन खासदार येतात. त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही मनावर घेत असाल तर तसा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत मांडण्यात येईल. दिल्लीला येण्यासाठी कोणी इच्छुक नसतं, मात्र भास्कर जाधव यांनी इच्छा व्यक्त केली त्यामुळे कौतुक आहे,” असे सुळे यांनी म्हंटले.