Wednesday, March 29, 2023

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला

- Advertisement -

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. १० मिनिटं अजित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे मंत्रालयातून बाहेर पडल्या. मतदारसंघातील कामासाठी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली होती. पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत आणि त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर अजित पवार आणि पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीकडूनही अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पार्थ पवार यांनाही आजोबांनी केलेल्या या वक्तव्यावर विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण टाळलं आहे.

शरद पवारांचा पार्थवर निशाणा
शरद पवार यांनी पार्थ पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काल अजित पवार शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. ही बैठक पूर्वनियोजित होती, तसंच अजित पवार नाराज नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी बैठकीनंतर दिलं.

- Advertisement -

अजित पवार नाराज नसल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येही अजित पवार मधूनच गेले, पण त्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती. तसंच मंत्रिमंडळ बैठक लांबली आणि अजित पवारांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते गेल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”