सांगलीत २९ साळुंख्या, २ मोर आणि ३ पारवे यांचा संशयास्पद मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यात 29 साळुंख्या 2 मोर आणि 3 पारवयांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या साळुंख्या नष्ट केल्या असून, नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मिरज तालुक्यातील सावली येथे 29 साळुंख्याचा मृत्यू झाला. याच गावातील 3 पारवाचा मृत्यू झाला. तर जत तालुक्यातील आवंडी येथील 2 मोरांचा मृत्यू झालाय. दरम्यान, अजून तपासणीचा रिपोर्ट आला नाही, लोकांनी घाबरू नये, अस आवाहन सांगली जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त संजय धकाते यांनी केलं आहे.

राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या व इतर पक्षी दगावल्याचे आढळून आले आहे. मिरज तालुक्यातील सावळी येथील वेस्टर्न प्रेसिकास्ट प्रा. लि. कंपनीच्या आवारात पक्षी मृत झाल्याचे आढळून आले आहे. या पक्षांच्या मृत्यूच्या कारणाचे निष्कर्ष येणे अद्याप बाकी आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असून यामध्ये त्यांनी मृत पक्षी आढळून आलेल्या ठिकाणास केंद्र बिंदू मानून 10 किलोमीटर परिसरामध्ये कुक्कुट पक्ष्यांची, पक्षी खाद्यांची, अंडी खरेदी, विक्री,वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच सावळी हे गाव अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment