सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह कुटुंबियांना ‘स्वरगंधा सांगितिक कुटुंब पुरस्कार’ जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | गानवर्धन संस्थेतर्फे शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबियांना कै. स्वरगंधा टिळक स्मृती सांगितिक कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी, संध्याकाळी 5.00 वाजता, टिळक स्मारक मंदिर सभागृहात सिम्बाॅयोसीस शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रमुख पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप पन्नास हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे असणार आहे.

यादरम्यान भारतातील विविध ठिकाणी असलेले त्यांच्या कुटुंबातील सतारवादक रईस खान, हाफीज बाले खान, छोटे रहिमत खान, कन्या रुकैया आणि नात माध्यमी हे सर्व कलाकार एकत्र येणार अाहेत. हे सर्वजण ‘सतार संध्या’ ह्या कार्यक्रमात एकत्रितपणे सतार वादन करणार आहेत. यावेळी तबल्यावर पांडुरंग पवार हे साथ देणार आहेत. हा कार्यक्रम पुणेकर रसिकांसाठी विनामुल्य खुला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.