औरंगाबाद जिल्ह्यात दोन कारचा भीषण अपघात; Video आला समोर

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव गावाजवळ एक भीषण अपघात (accident) घडला आहे. या भीषण अपघातात (accident) 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्विफ्ट आणि वॅगनार कारमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती कि या अपघातात दोन्ही गाड्यांचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघातातील स्विफ्ट कार औरंगाबादमधील बजाज नगर येथील तर वॅगनार कार अमरावती येथील असल्याचे समोर आले आहे.

या अपघाताची (accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने गंगापूर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काही वेळानंतर दोन्ही गाड्यांना बाजूला करण्यात आले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

काय घडले नेमके?
हा अपघात (accident) नगर औरंगाबाद महामार्गावरील नवीन कायगाव येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. एका स्विफ्ट कारमधून 5 ते 6 काही लोक नगरकडून औरंगाबादच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडर चढून विरुद्ध दिशेला जाऊन औरंगाबादहुन नगरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅगनार कारवर आदळली. यामध्ये स्विफ्ट कार मधील चार जणांचा जागेवर मृत्यू झाला. तर बाकी जखमींना उपचारांसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अशी आहेत मृत आणि जखमी व्यक्तींची नावे
रावसाहेब मोटे, सुधीर पाटील, महानगर रतन बेडवाल यांच्यासह एका व्यक्तीचा या भीषण अपघातात (accident) मृत्यू झाला. तर शशीकला कोरट, सिध्दांत जंगले, छाया हेमंत जंगले आणि शकुंतला जंगले राहणार अमरावती हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नेवासा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असून, मृत झालेल्या चार जणांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती