हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने ‘एसी’चा वापर कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने यायाबाबत एक परिपत्रक काढून एसीच्या वापराबाबत सूचना दिल्या आहेत. घर, कार्यालयात एसीचा वापर केल्यास तिथे करोनाचा असल्यास थंड वातावरणात तो जास्त काळ टिकतो. त्यामुळं एसीच्या वापरावर मर्यादा घालण्याचं सरकारने परिपत्रकातून आवाहन केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
कनोरोनाचा विषाणू थंड वातावरणात जास्त काळ टिकून राहतो. जर घर किंवा कार्यालयातील ‘एसी’ चालू असल्यास करोनाचा विषाणू जास्त काळ टिकून राहून त्याचा फैलाव होण्यास मदत होईल. त्यामुळं नागरिकांनी आपल्या घर कार्यालयातील एसी न लावता पंखे लावावे किंवा खिडक्या उघडाव्या. केंद्र सरकार आणि ‘डब्लूएचओ’च्या ऍडव्हायझरीच्या आधारावर राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.