मुंबई । ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी 20 वर्ल्ड कप प्रस्तावित आहे. पण कोरोनामुळे त्याच्या आयोजनावर शंका आहे. आयपीएलच्या उर्वरित 31 सामन्यांव्यतिरिक्त BCCI युएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप देखील आयोजित करू शकते. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने टी -20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई गाठली आहे. आता लवकरच वर्ल्ड कप आयोजनाबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकेल. यावर निर्णय घेण्यासाठी आयसीसीने BCCI ला 28 जूनपर्यंतची मुदत दिली आहे.
वृत्तसंस्था ANI च्या म्हणण्यानुसार, BCCI ने कर माफीसंदर्भात 15 जूनपर्यंत आयसीसीला कळविणे आवश्यक आहे. BCCI च्या एका सूत्राने सांगितले की, ‘सौरव गांगुली मुंबईत टी 20 वर्ल्ड कप विषयी महत्वाची चर्चा करणार आहेत. आयसीसीला मंगळवारपर्यंत कर माफीची माहिती द्यावी लागेल. 28 जूनपर्यंत आयोजनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत या स्पर्धेसंदर्भात बरेच निर्णय घेतले जाऊ शकतात.
युएईशिवाय श्रीलंकासुद्धा या स्पर्धेच्या शर्यतीत आहे
युएईमध्ये टी -20 विश्वचषक आयोजित करण्याबाबत BCCI आणि युएई बोर्ड यांच्यात चर्चा सुरू आहे. या व्यतिरिक्त श्रीलंकासुद्धा हे आयोजन करण्याच्या शर्यतीत आहे. युएईमध्ये दुबई, शारजाह आणि अबूधाबी या तीन ठिकाणी स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. दुसरीकडे, श्रीलंकेचा विचार केला तर कोलंबोमध्ये फक्त तीन स्टेडियम आहेत. श्रीलंकेच्या बोर्डाने BCCI ला आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करण्याचा प्रस्तावही दिला होता.
युएई मधील खेळपट्टीबद्दल शंका
आयपीएल व्यतिरिक्त आणखी अनेक सामने युएईमध्ये होणार आहेत. अशा परिस्थितीत वर्ल्ड कप दरम्यान खेळपट्टीची स्थिती चांगली राहणार नाही. खेळपट्टीची परिस्थिती पाहता श्रीलंका बोर्डाशी चर्चा सुरू आहे. याच कारणास्तव ओमानमध्ये वर्ल्ड कपचा सलामीचा सामना होण्याची चर्चा आहे. युएईमध्ये PSL चे 20 सामनेही सुरू आहेत. यानंतर आयपीएलचे उर्वरित 31 सामने खेळले जाणार आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय मालिकादेखील होणार आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा