स्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी मुखर्जीचा मर्दानी २

एका सक्षम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका (एस.पी शिवानी रॉय) राणी मुखर्जीने चित्रपटात साकारली आहे. एका राजकीय हेतूसाठी आयात केलेल्या गुंडांकडून त्याच्या वेडपट स्वभावाला अनुसरून महिलांना त्रास देण्याचं काम सुरु असतं. सिरीयल किलर प्रकारात मोडणारा हा गुंड (सनी) जिल्ह्याच्या महिला पोलीसप्रमुखाला (एस.पी शिवानी रॉय) आव्हान देण्याच्या प्रयत्नात अनेक करामती करत असतो.

भन्साळींच्या ‘सिया जिया’ मध्ये तापसी डबल रोलमध्ये…

चित्रपटांच्या निवडीमुळे आणि बॉलिवूडमध्ये दमदार अभिनयामुळे स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करणार्‍या तापसी पन्नू या वेळी पडद्यावर वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. गुलाबी, मनमर्जियान, सँड की आँख आणि मुल्क सारख्या चित्रपटात चमकदार कामगिरी करणा तापसी पन्नूने नुकताच एक नवीन संजय लीला भन्साळी चित्रपटाला साईन केले आहे. ‘सिया जिया’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच तापसी पन्नू डबल रोलमध्ये दिसणार आहे. असा विश्वास आहे की या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच मजबूत दिसेल.

खिलाडी अक्षयच्या चित्रपटावर कायदेशीर कारवाई ?

सध्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांबद्दल जबरदस्त चर्चा सुरू आहे. त्याच वेळी एकामागून हिट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारवर हल्ला होत आहे. यावर्षी आतापर्यंत त्याचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले असून , चौथा चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहे. आश्चर्य म्हणजे अक्षयचे सर्व चित्रपट चांगलेच गाजले. अशा परिस्थितीत त्यांना बॉक्स ऑफिस किंग म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबरोबरच त्याच्या आगामी अनेक चित्रपटांचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, त्याचा आगामी एक चित्रपट अडचणीत आला आहे. लवकरच या चित्रपटावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.

वरून धवनच्या स्टंट दरम्यान घडले असे काहीतरी , ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती …

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या कारकिर्दीचा आलेख खूप वेगाने वर जात आहे. त्यांनी आत्तापर्यंत एकूण 14 चित्रपट केले आहेत, त्यापैकी फक्त 2 फ्लॉप झाले आहेत. आजकाल तो वडील डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘कुली नंबर वन’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 1995 मध्ये रिलीज झालेल्या गोविंदा स्टारर चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये सारा अली खान वरुणसोबत दिसणार आहे.

महानायक अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल !

यकृताच्या त्रासामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आपलं यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी सांगितलं होतं. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार , अमिताभ बच्चन यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवारी रात्री २ वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.